Tuesday, July 8, 2008

तुला पाहिल्या त्या क्षणापासून तू

मनात तू, कल्पनेत तू, माझ्या ध्यानात तू
माझ्या नयनात तू, त्यांतील स्वप्नातही तू

पुस्तकात तू, त्यांतल्या पानात तू, ओळीतही तू,
अक्षरांत तू, शब्दात तू, माझ्या कवितेतही तू..

पानात तू, फुलांत तू, त्यांच्या गंधातही तू,
रुपात तू, मोहकतेत तू, सुंदरतेतही तू...

चिम्ब पावसात तू, असंख्य जलधारात तू,
अन त्याच्या टपोरया थेम्बातही तू..

ग्रीष्मात तू, त्यांतल्या उष्ण लहरीतही तू,
शरदेत तू, शेकोटीतील उबीतही तू..

तिथि तू, वार तू, नक्षत्रेही तू,
काल तू, आज तू, अन उद्याही तू..

संगीत तू, गायन तू, सुमधुर गाणेही तू,
गज़ल तू, कव्वाली तू, शायरीही तू..

मी तू, माझे मन तू, आत्माही तू,
तुला पाहिल्या त्या क्षणापासून तू

1 comment:

SACHIN PATHADE said...

chchan aahe .....keep it up!!!